श्री दत्तात्रेयांना एक विशेषण वापरतात ते आहे 'पूर्णराते'. या एकाच शब्दात श्री स्वामी महाराजांनी शेकडो व्याख्या सांगितल्या आहेत. पूर्णरात शून्याला म्हणतात किंवा अमावसेलाही म्हणतात. अमावस्येला आकाशात प्रकाश देणार अस काही नसत।केवल शून्य असत. शून्य असत याचा अर्थ तिथे काहीच नसत अस नाही; परन्तु जे काही असत त्याच्या अस्तित्वाला काहीतरी आहे अस म्हणता येत नाही. त्याच प्रमाणे हा पूर्णराते सुद्धा स्वतः 'शून्य' आहे. ईशावास्य उपनिषदातील
'पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण मुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते |'
याचा अर्थ असा आहे की पूर्णातुन पूर्ण काढल तरी तिथे पूर्णच शिल्लक उरत.
काहीच नसलेल्या या 'शून्य' शब्दाची कीमत महाप्रचण्ड आहे. या शुन्याने कशालाही गुणल किंवा भागल असता उत्तर शून्यच येत किंवा जे येत ते सांगता येत नाही. हेच तत्व उपनिषदांनी 'पूर्णमदः' वाक्याद्वारे सांगितल आहे. हेच शून्य इतर कोणत्याही संख्येपुढे ठेवले, तर त्याची किंमत दहापट वाढते. याचाच गुढ़ार्थ असा की, तुम्ही किती होता, त्यावर अत्रिनन्दनाच्या अनुग्रहाचा परिणाम ठरतो. म्हणजेच सदगुरूतत्वाने अनुग्रह केल्यानंतर, भक्ताची किंमत किती वाढेल हे त्या भक्तावरच अवलंबून आहे. कमतरतेचा दोष हा सदगुरूतत्वाचा नसतो. भक्त जर १०० बनला नाही,तर सदगुरू त्याला १००० बनवु शकणार नाही आणि तो जर एकच राहिला तर फक्त १०च बनु शकेल.
याच्याही पलीकडे गणितातील एक सिद्धान्त आहे, तो म्हणजे शून्यामध्ये असंख्य राहतात. याप्रमाणे शून्य स्वतः काही नसतानासुद्धा अनन्त शक्तीच् सामर्थ्य ठेवतो. जसा हा गणितातला पूर्ण तसाच आत्रेय हा अध्यात्मातला पूर्ण. 'पूर्णराते' इतका समर्पक शब्द सदगुरूतत्वासाठी दूसरा नाहीच. देणारा हा पूर्ण असल्याने अगणित पटीत देतो आहे, घ्यायच किती हे घेणार्याच्या कुवती वरच अवलंबून आहे. या पूर्ण नावाच्या शून्याचा उपयोग कसा करायचा, हे ज्याने त्याने ठरवायचे. या शून्याचा उपयोग करण्याच् कौशल्य म्हणजे पूर्ण विश्वासासह पूर्ण शरणागती. आपण घोरकष्टोद्धरण स्तोत्रामध्ये "पूर्णराते" हा शब्द म्हणतो.
No comments:
Post a Comment