Thursday, August 30, 2018

मी देवाचा व देव माझा






!! मी देवाचा व देव माझा !!

एकदा श्री वासुदेवानंद सरस्वती नदीमध्ये अंघोळ करीत होते.तेव्हा एक चिकित्सक माणसाने त्यांना विचारले कि,देव जर निर्गुण निराकार आहेत तर आपण रोज देवाच्या मूर्तीची पूजा का करतो ? आणि दुसरे म्हणजे आपण तर संन्याशी आहात.आपल्याला देवांच्या मूर्तीची आवश्यकता काय?श्री टेंबे स्वामींनी उत्तर दिले कि ,नित्य एकाग्र मनाने पूजा केल्यामुळे मी व मूर्ती एकरूप झालेलो आहोत.मी देवाच्या मूर्ती शिवाय राहू शकत नाही.व देवांची मूर्तीही बहुतेक माझ्याशिवाय राहणार नाही.

जर तुम्हाला पाहिजे तर पलीकडे ठेवलेली मूर्ती घेऊन जा. त्या प्रमाणे श्री टेंबे स्वामींनी मूर्ती त्या माणसाचे हवाली केली व ते पुढे चालू लागले.तो माणूस हि त्याचे घरी जाऊ लागला.१ ते १ || मैल गेल्यावर त्या माणसाने मूर्तीकडे लक्ष दिले.तेव्हा मूर्ती तेथे नव्हती .मूर्ती गायब झाली होती. तो माणूस घाबरला व पळत पळत स्वामींकडे आला.व वरील घटना सांगितली.स्वामींनी त्याला मागे बघावयास सांगितले .ती मूर्ती स्वामींचे मागे येत होते अशा रीतीने मूर्तीमध्ये देखील चैतन्य निर्माण होऊ शकते. एकनिष्ठ भक्ताशिवाय मूर्ती राहू शकत नाही.जसे भक्ताच्या मनामध्ये देवाला भेटण्याची आत्यंतिक इच्छा उत्पन्न होते.व तो देवाला भेटल्याशिवाय राहू शकत नाही तसे देव देखील भक्ताशिवाय राहू शकत नाही.उलट तो एकनिष्ठ भक्ताची वाट पाहतो.भक्ताच्या मनाची स्थिती अशी होते कि,”मी देवाचा व देव माझा”ह्या शिवाय त्याला दुसरे काही सुचत नाही.जेव्हा भक्त देवाला संपूर्णपणे वाहून घेतो तेव्हा देव देखील भक्ताची काळजी वाहताे. 

॥श्री गुरुदेव दत्त॥

No comments: